मी राजीनामा दिलाच नाही, श्रीपाद छिंदमचा दावा !

मी राजीनामा दिलाच नाही, श्रीपाद छिंदमचा दावा !

अहमदनगर –  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगर मनपाचा भाजपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमनं राजीनामा दिला नसल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनीच माझ्या लेटरहेडचा गैरवापर केला आणि राजकीय षडयंत्रातून माझ्या लेटरपॅडवर बनावट सहीने उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर केला असल्याचा आरोप छिंदमने केला आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी छिंदमनं  केली आहे.

दरम्यान छिंदमनं उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी भाजप खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमची पक्षातून हकालपट्टी करुन उपमहापौर पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केला होता. त्याचबरोबर मनपाच्या महासभेत छिंदमचं नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर केला होता. तसेच भाजप खासदार दिलीप गांधी यांनीच छिंदमचा राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र छिंदमच्या या दाव्यानं गांधी तोंडघशी पडले आहेत. या प्रकरणी खासदार गांधी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

COMMENTS