श्रीपाद छिंदमची नाशिकरोड कारागृहात रवानगी !

श्रीपाद छिंदमची नाशिकरोड कारागृहात रवानगी !

अहमदनगर – अहमदनगर येथील भाजपचा वादग्रस्थ उपमहापौर श्रीपाद छिंदम याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील कारागृहात श्रीपाद छिंदमला शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी तेथील कारागृहातील कैद्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनानं खबरदारी घेत सुरक्षेच्या कारणास्तव छिंदमची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केली असल्याची माहिती आहे.

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे श्रीपाद छिंदम वादात सापडला आहे. देशभरातून त्याच्याविरोधात तीव्र पडसाद उमटत असल्याचं पहावयास मिळत आहे. श्रीपाद छिंदमवर कडक कारवाई करुन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान भाजपनं त्याची पक्षातून हकालपट्टी केली असून उपमहापौरपदही काढून घेतलं असल्याची माहिती आहे.

COMMENTS