अहमदनगर निवडणूक – श्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार !

अहमदनगर निवडणूक – श्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार !

अहमदनगर –  महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याला निवडणूक काळात शहरातून हद्दपार करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकाय्रांनी दिला आहे. छिंदम याच्यासह ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे, दिपक खैरे या पाच जणांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी यापूर्वीही छिंदमला चडीपार करण्यात आले होते.

१५ दिवसांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वीच्या निवडणूक काळातही छिंदम याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.निवडणुक काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कोतवाली, तोफखाना व भिंगार कँप पोलिसांनी आजी, माजी आमदार, विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवकांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS