राज्यात महाशिवआघाडीचं सरकार निश्चित?, आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला!

राज्यात महाशिवआघाडीचं सरकार निश्चित?, आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला!

मुंबई – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार निश्चित झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव घेऊन आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर केली असून शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आज सकाळी झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्यामुळे राज्यातील 6 नेते दिल्लीला पोहोचले होते. या बैठकीत काँग्रोसनं अखेर पाठिंबा दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकऴा झाला आहे.

तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ !

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे 56 आमदार आहेत, तर त्यांना 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ होत आहे.

असा आहे प्रस्ताव?

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1-1 उपमुख्यमंत्री आणि 14-14 मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS