चंदीगढ – पाकिस्तानच्या आर्मी प्रमुखाला मिठी मारण्याचा विषय देशभरात चांगलाच चर्चीला जोतोय. भाजपने नवजोतसिंग सिद्धु यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नवजोतसिंग सिद्धु यांनी मात्र या कृतीचं समर्थन केलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला सिद्धू यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार ते शपथविधी कार्यक्रमाला गेले होते. त्या ठिकाणी सिद्धु यांनी पाकिस्तानचे आर्मी प्रमुख जावेद बावेजा यांना अलिंगन दिलं. सिद्धु यांच्यावर भाजपकडून टीका होत असताना आता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच त्यांना फटकालं आहे. देशात मोठ्या प्रमाणात जवान शहीद होत असताना पाकिस्तानाच्या आर्मी प्रमुखांना अलिंगन देणं चुकीचं असल्याची टीका पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केली आहे.
COMMENTS