मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सिल्व्हर ओकवरील 2 जणांना कोरोनाची लागण झाली असून शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कराड दौऱ्यानंतर हे सुरक्षा रक्षक पॉझिटीव्ह आले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पण त्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
दरम्यान, थेट सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर शरद पवार विशेष खबरदारी घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची माहिती आहे. तसेच सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या स्वीय सहाय्यकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याचे रिपोर्ट येणं बाकी असून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे.
COMMENTS