लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना-भाजपचा प्राथमिक अहवाल, 16 जागांवर अंतर्गत वादाचा फटका बसणार ?

लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना-भाजपचा प्राथमिक अहवाल, 16 जागांवर अंतर्गत वादाचा फटका बसणार ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरचा फटका बसणार असल्याचा अंदाज शिवसेना भाजपच्याच अहवालात मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात 16 जागांवर अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी अंदाज बांधणंही अवघड असल्याचा प्राथमिक अहवाल भाजप आणि शिवसेनेनं तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालातच अंदाज मांडणे अवघड असल्याचं म्हटलं असल्यामुळे शिवसेना-भाजपला या 16 जागांवर पराभव होतो की काय अशी भीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान येत्या 23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु या निकालाबाबत राजकीय पक्षांकडून अंदाज मांडले जात आहेत. राजकीय जानकारांकडूनहीै विविध अंदाजही मांडले जात आहेत.
शिवसेना-भाजपनंही अंतर्गत अहवाल तयार केला असून या अहवालात अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यात 16 जागांवर अटीतटीच्या लढती झाल्यानं अंदाज बांधणंही अवघड असल्याचा प्राथमिक अहवाल भाजप आणि सेनेनं तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या जांगांवर निकाल काय लागणार याची चिंता या नेत्यांना खात असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS