मुंबई – हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी तसेच दुष्काळी मदत म्हणून शेतक-यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते.
COMMENTS