नवी दिल्ली – बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीतून उत्तर दिलं आहे. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापूस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत देण्याची मागणी संसदेत केली. यावर स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर देत मी महाराष्ट्राचीच असून मलादेखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत असं म्हटलं आहे.
बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त कापुस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत तारांकित प्रश्न विचारत केली. pic.twitter.com/lmbGnhkvIZ
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) June 28, 2019
दरम्यान वस्त्रोद्योग विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांकडे लक्ष द्यावं. ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी मराठीत सुरुवात केली. मी महाराष्ट्राचीच असून मलादेखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत. तसेच या शेतकय्रांना योग्य ती मदत दिली जाईल असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
COMMENTS