“राज ठाकरे व्यंगचित्रं काढत बसतात, म्हणूनच त्यांचे नेते पक्ष सोडून जातात !”

“राज ठाकरे व्यंगचित्रं काढत बसतात, म्हणूनच त्यांचे नेते पक्ष सोडून जातात !”

बई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या व्यंगचित्राद्वारे अनेक राजकीय नेते आणि पक्षांवर फटकारे ओढत असतात. अनेक वेळा राज ठाकरेंच्या व्यंगचित्रालाही प्रत्युत्तर दिलं जातं. सरकारी अधिकारपदांच्या संधी खासगी क्षेत्रातील व्यक्तींना खुल्या करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काल राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या टीकेला आता सोशल मीडियातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून राज ठाकरे व्यंगचित्रं काढत बसतात, म्हणूनच त्यांचे नेते पक्ष सोडून जातात, असा खोचक टोला व्यंगचित्रातून त्यांना लगावण्यात आला आहे.

दरम्यान ‘बारामतीच्या बळावर’ असं शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आलं असून यामध्ये राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटताना दाखवण्यात आले आहेत. राज ठाकरे फक्त व्यंगचित्रात मग्न असल्यानं त्यांच्याकडे पक्षाकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे मनसेचे नेते पक्षाला रामराम करत आहेत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. ‘हम व्यंगचित्र बनाते रहे, और लोग हमसे दूर जाते रहे,’ असं राज ठाकरे यांच्या पाठीवर काढण्यात आलं आहे. तर मनसेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वागत करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. तसेच व्यंगचित्रात दोन महिला दाखवण्यात आल्या असून त्यामध्ये एका महिलेजवळ पोपट दाखवण्यात आला आहे. त्यावर आय्या बारामतीच्या बागेतून आलेला पोपट वाटतं असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS