मोदीजी या प्रश्नांची उत्तरे द्या, सोशल मीडियावर व्हायरल होतोय मेसेज !

मोदीजी या प्रश्नांची उत्तरे द्या, सोशल मीडियावर व्हायरल होतोय मेसेज !

मुंबई – सर्वसामान्य जनतेला व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे सध्या प्रभावी माध्यम आहे. कोणी सरकारच्या चांगल्या कामाची माहिती त्यामधून देते तर कोणी सरकारच्या उणीवा समाजासमोर आणतात. अर्थात प्रत्येक जण आप आपल्या कुवतीप्रमाणे ते सांगत असतो. त्याच्यावर उलट सुलूट चर्चाही होतात. कधी कधी काही राजकीय पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून असा विविध गोष्टी व्हायरल करत असतात.

असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा मेसेज कुठल्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने तयार केला आहे की सर्वसामान्य जनतेनं याबाबत माहिती नाही. यामधील सरकारला विचारलेले प्रश्न योग्य आहे की अयोग्य आहेत हेही आम्ही सांगू इच्छित नाही. वाचकांनी ते वाचावे आणि आपआपली मते याबाबत ठरवावी. जसा मेसेज व्हायरल होतोय तसाच आम्ही देत आहोत.

मोदी सरकारला चार वर्ष पुर्ण झाली आहेत. 4 वर्ष — 48 महिने त्यामुळे 48 प्रश्न विचारले आहेत.

१)  भारतातील चार शहरांची नावे सांगावित जी स्मार्ट सिटी झालीत.

२)  बाकीचे जाऊ द्या पण भाजपा खासदारांनी दत्तक घेऊन आदर्श ग्राम केलेली चार गावाची नावे ?

३)  चार जिल्ह्यांची नावे जेथे प्रत्येक घरटी शौचालय आहे.

४)  चार राज्यांची नावे जिथे २५०० किमी रस्ते झाले आहेत.

५)  चार जिल्ह्यांची नावे जेथे नविन सरकारी दवाखाने उभारले गेले.

६)  चार बँकेच्या शाखांची नावे जिथे उघडली गेलेली सर्व जनधन खाती वापरात आहेत.

७)  चार अशा देशांची नावे जेथे मोदींनी दौरा केला आणि त्या देशानी भारतात गुंतवणुक केली आहे.

८)  चार असे औद्योगिक अथवा सेवा क्षेत्रे जेथे वर्षात दोन कोटी तर सोडा पण दोन लाख रोजगार निर्माण झाले.

९)  चार राज्यांची नावे जेथे विज उत्पादनासाठि नविन प्रकल्प उभारले.

१०)  चार केंद्रीय मंत्र्यांची नावे ज्यांनी स्वत:च्या मंत्रालयात नविन योजना सुरु केल्या.

११)  चार अशी शहरे जी पहिल्यापेक्षा स्वच्छ झाली.

१२)  चार अशी राज्ये जेथे शेतकरी आत्महत्त्या थांबल्या आहेत.

१३)  असे चार किलोमिटर जेथे गंगा स्वच्छ झाली.

१४)  अशा चार लोकांची नावे ज्यांचा ब्लॅकमनी सापडला.

१५)  असे चार भ्रष्टाचारी ज्यांना तुरुंगात पाठवले.

१६)  अशी चार राज्ये ज्यांच्या प्रत्येक गावात विज पोहोचली आहे.

१७)  असे चार जिल्हे जेथे नविन पाटबंधारे योजना सुरु करण्यात आली आहे.

१८)  चार असे विभाग जेथे भ्रष्टाचार पुर्ण बंद झाला.

१९)  असे चार सरकारी दवाखाने जेथे त्यांच्या एवढे डाॅक्टर नेमले गेले आहेत.

२०)  अशी  चार भाजपा शासित मंत्रिमंडळे ज्पातील कोणत्याही मंत्र्यावर कसल्याहि प्रकार गुन्हे दाखल नाहीत.

२१)   भारतातिल अशी चार राज्ये जेथे महिला सुरक्षित आहेत.

२२)  गेल्या चार वर्षातील असे चार आठवडे जेव्हा देशात एक ही अतिरेकि, नक्षलवादी अथवा सिमारेषेवर परकियांनी हल्ला केला नसेल.

२३)  असे चार आठवडे जेव्हा देशात एक ही बलात्कार झाला नाही.

२४)  अशी चार राज्ये जेथे दलितांवर अत्याचार झाला नाही.

२५)  अशा चार तालुके जेथील सर्व BPL महिलांना उज्वला योजनेद्वारे गॅस कनेक्शन दिले आहेत.

२६)  निवडणूक सोडुन असे चार महिने जेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नाहित.

२७)  चार राज्पांची नावे जेथे विमानासाठी नविन धावपट्टी बनवली गेली.

२८)  अशा चार फरार आरोप्यांची नावे ज्यांना परदेशातुन भारतात परत आणण्यात आले.

२९)  असे चार अब्जाधीश ज्यांची संपत्ती वेगाने वाढते आहे पण ज्यांचा भाजपाशी संबंध नाही.

३०)  अशी चार क्षेत्रे जेथे FDI ला परवानगी नाही.

३१)  भारतातील असे चार ATM जेथे पुर्ण महिनाभर पैसे असतात.

३२)  असे चार महिने जेव्हा सिमेवर भारतीय  जवान शहिद झाले नाहीत,

३३)  असे चार भाजपाचे प्रवक्ते फक्त विकासावर बोलतात, हिंदु मुस्लीम या विषयावर नाही.

३४)   संसद अधिवेशनाची अशी चार सत्रे ज्याचे कामकाज पुर्ण चालले आहे.

३५)  अशा चार केंद्रिय मंत्र्यांची नावे जे मंत्रालयातील निर्णय स्वत: घेतात.

३६)  चार अशी उत्पादन क्षेत्रे ज्यामध्ये निर्यात वाढली आहे.

३७)  अशा चार राज्यांच्या निवडणुका जेथे पंतप्रधानासह निम्म्यापेक्षा कमी मंत्रीमंडळ हजर नव्हते.

३८)  प्रचार सभेतील पंतप्रधानांची अशी चार भाषणे की ज्यात त्यांनी फेकल नाही.

३९)   चार असे विदेश दौरे की ज्यामध्ये पंतप्रधानांनी एका दिवसामध्ये चारपेक्षा कमी ड्रेस वापरले आहेत.

४०)  असे चार आठवडे जेव्हा देशातील जनतेला अच्छे दिन आल्यासारख वाटले आहेत.

४१)   पंतप्रधानांनी अशी एखादी विदेश यात्रा ज्यावर देशाचे १० कोटी रुपयापेक्षा कमी खर्च झाला आहे.

४२)  पंतप्रधानांचा असा निवडणूक प्रचार दौरा ज्याच्यावर पाच कोटीपेक्षा कमि खर्च झाला आहे.

४३)  पेट्रोल डिझेल करवाढीमुळे दरमहा होणारी जमा रक्कम कीती आहे ?

४४)   फक्त दोन वर्षात तयार झालेल्या भाजपाच्या सप्ततारांकित कार्यालयाच्या बांधकामाचा एकुण खर्च किती ?

४५)   भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या मुलाने मंदिच्या दिवसातहि फक्त सहा महिन्यात ५० हजार रुपयांचे ८० कोटी रुपये कोणत्या धंद्यात व कसे केले ?

४६)   रामदेवबाबाची संपत्ती  १३ हजार कोटीवरुन ४ वर्षात १लाख २३ हजार कोटी कशी झाली ?

४७)  मुकेश अंबानिंचा नफा अशा मंदीत ही ५००% कशामुळे वाढला ?

४८)   रमजानच्या महिन्यात अतिरेक्याबरोबर एकतर्फी शस्त्रसंधी करुन नक्की कोणाला खुश केलंत ? पाकीस्तानला का PDP ला ?

प्रश्न बरेच आहेत, पण सध्या तरी इतकेच.

COMMENTS