सोलापूर – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची गेल्या आठवड्यात निवडणूक झाली. ही निवडणूक म्हणज्ये विधानसभेची सेमीफायनल म्हणून त्याच्याकडं पाहिलं गेलं. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनलने विजय मिळवला. विशेष म्हणज्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचेच ज्येष्ठ नेते विजयकुमार देशमुख हे विरोधकांच्या पॅनलमध्ये होते. सहकारमंत्र्यांच्या पॅनलला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर विजयी पॅनलला तब्बल 16 जागा मिळाल्या. सुभाष देशमुख यांनी मंत्रिपदाचा वापर करत बाजार समिती ताब्यात घेण्याचा प्रय़त्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना फारसं यश आलं नाही.
दोन कारणांनी ही निवडणूक महत्वाची होती. एक म्हणज्ये जुन्या पॅनलमधील काही संचालकांनी बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्याची दखल घेत सहकार खात्याने पर्यायाने सहकरामंत्री सुभाष देशमुख यांनी पूर्वीचे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. ज्या संचालकांनी बाजार समितीच्या भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. पुन्हा तेच संचालक त्याच पॅनलमधून आणि दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरले होते. मात्र त्यापैकी एक जणांचा पराभव झाला. हा पराभव बरच काही सांगून जातो.
दुसरं म्हणज्ये सरकारच्या नव्या नियमांमुळे पहिल्यांदाच शेतक-यांना बाजार समितीमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे पूर्वी केवळ ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या एकाला मतदानाचा अधिकार होता. हे ठरावील मतदार हे काँग्रेस राष्ट्रवादीचे बांधील आहेत असा आरोप त्यामुळे इतर पक्षांना तिथे फारसा वाव मिळत नसे. मात्र यावेळी परिसरातील शेतक-यांनाच मतदानाचा अधिकार मिळाला. शिवाय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितेचे बहुतेक मतदार हे सोलापूर उत्तर या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील होते. त्यामुळे सुभाष देशमुख यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची होती. यामधला पराभवाचे पडसाद आता आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुख यांना या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात का होईना संच तयार करता आला हीच थोडीशी जमेची बाजू आहे.
COMMENTS