सोलापूर – सोलापूर महापालिकेत महाविकासआघाडीला धक्का बसला आहे. भाजपचे श्रीकांचना यन्नम सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. यन्नम यांना 51 मते मिळाली आहेत. भाजपचे 49 नगरसेवक आणि शिवसेना, बसपचं प्रत्येकी एका नगरसेवकानं भाजपला मतदान केलं. त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला. तर काँग्रेसचे 16,राष्ट्रवादीचे 4 बसापाचे 3 आणि शिवसेनेचे 20 नगरसेवक यावेळी तटस्थ राहिले.
दरम्यान महापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या आठ नगरसेवकांनी तटस्थ राहावे, असे आदेश एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादत यांनी मंगळवारी रात्री दिले होते. यामुळे महाआघाडीच्या गोटात खळबळ उडाली होती.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. महापौरपदासाठी चार सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून श्रीकांचना यन्नम तर महाविकास आघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली होती. 102 सदस्य असलेल्या या महापालिकेत भाजपकडे सर्वाधिक 49 सदस्य आहेत. भाजपनंतर शिवसेना 21, काँग्रेस 14, एमआयएम 9, राष्ट्रवादी 4 वंचित बहुजन आघाडी 3, बसपा 1, माकड 1 असे पक्षीय बलाबल आहे.
COMMENTS