सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर सोहळ्यात धनगर बांधवांचा राडा!

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतर सोहळ्यात धनगर बांधवांचा राडा!

सोलापूर – सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं नामकरण आज करण्यात आलं आहे. यावेळी जलसंपदा मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यसभा खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या नामकरण सोहळ्यादरम्यान काही धनगर बांधवांनी राडा केला होता. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विद्यापीठ नामांतरासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

दरम्यान धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना व्यासपीठावर का बोलावलं नाही असा सवाल करत त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे काही काळासाठी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रमही रोखावा लागला होता. त्यानंतर महादेव जानकर यांनी गोपीचंद पडळकर यांना व्यासपीठावर बोलावल्यानंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

COMMENTS