नवी दिल्ली – लोकसभेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांचं आज सकाळी सव्वा आठच्या दरम्यान निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. सोमनाथ दा या नावाने ते परिचीत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालवली. सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. कडक शिस्तीचे आणि निपक्षपाती लोकसभा सभापती अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. लोकसभेवर ते तब्बल 10 वेळा निवडणू आले होते. सुमित्रा महाजन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
COMMENTS