मुंबई – महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाला सुरुवात झाली असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून 9 जिल्हाध्यक्षांच्या निवडीला मान्यता दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असताना थोरात यांना जिल्हाध्यक्ष बदलण्याची सोनिया गांधींनी परवानगी दिल्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसच्या 9 जिल्हाध्यक्षांची यादीदरम्यान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा काँग्रेस श्रेष्ठींचा विचार असल्याची चर्चा होती. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचा काँग्रेसमध्ये विचार असला असल्याचं बोललं जात होतं. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूलमंत्री पद असल्यामुळे त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल असं बोललं जात होतं. परंतु थोरात यांना जिल्हाध्यक्ष बदलण्याची सोनिया गांधींनी परवानगी दिल्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS