मुंबई : मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला अभिनेता सोनू सूदने आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोनू सूदने भेट घेतली आहे. शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS