प्रियांका गांधींच्या एन्ट्रीनंतर युपीत सपा-बसपाची काँग्रेसला मोठी ऑफर !

प्रियांका गांधींच्या एन्ट्रीनंतर युपीत सपा-बसपाची काँग्रेसला मोठी ऑफर !

नवी दिल्ली प्रियांका गांधी यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलली असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसच्या मित्रपक्षांनी प्रियांकांच्या राजकीय प्रवेशाची दखल घेतली असून स्वतंत्र आघाडीची घोषणा करणा-या सपा-बसपाने काँग्रेसला ऑफर दिली आहे. या दोन्ही पक्षांनी सुरुवातीला काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या होत्या. परंतु आता याच दोन्ही पक्षांनी काँग्रेसला 14 जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे. यावर काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने सपा-बसपाकडे 30 जागा मागितल्या आहेत.

दरम्यान 2019च्या निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात महाआघाडी होण्याआधीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडीची घोषणा केली होती. दोन्ही पक्षाने उत्तर प्रदेशातील 80 लोकसभेच्या जागांपैकी 38-38 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. तर दोन जागा आघाडीतील अन्य पक्षांना आणि काँग्रेस पक्षासाठी अमेठी आणि रायबरेली या दोन जागा सोडल्या होत्या.

बसपा-सपाने आघाडीची घोषणा केल्यानंतर या दोन्ही पक्षांनी काँग्रेससोबत कोणतीही आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवल्यानंतर सपा-बसपानं अखेर काँग्रेससाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS