विधानसभा निवडणूक जाहीर होताच काँग्रेसला धक्का, बसपा नंतर सपाचाही काँग्रेसला टाटा-बायबाय !

विधानसभा निवडणूक जाहीर होताच काँग्रेसला धक्का, बसपा नंतर सपाचाही काँग्रेसला टाटा-बायबाय !

लखनऊ – काल जाहीर झालेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काल जाहीर झालेल्या मध्य प्रदेश आणि छत्तिसगडमध्ये काँग्रेसोबत युती करणार नसल्याचं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे. बसपानं तीन राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे.

मध्यप्रदेश आणि छत्तिसगडमध्ये आपण युतीसाठी काँग्रेसची खूप वाट पाहिली. परंतू काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसशिवाय आता या दोन्ही राज्यात समाजवादी पार्टी निवडणूक लढवेल असंही अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे. छत्तिसगडमध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत सपाची आघाडीबाबत चर्चा सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्तिसगडमध्ये यापूर्वीच अजित जोगी यांची छत्तिसगड जनतंत्र काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भाजप विरोधी पक्षाच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्याता आहे. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

COMMENTS