भागवतांना ओवैसींचा सवाल

भागवतांना ओवैसींचा सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू देशविरोधी असू शकत नाही असे विधान केले होते. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गांधींची हत्या करणारा गोडसेविषयी काय सांगाल? नेल्ली हत्याकांड, १९८४ शीख विरोधी दंगल आणि २००२ गुजरात दंगलीला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणार?,” असे सवाल उपस्थित केले आहेत.

‘सेंटर फॉर पॉलसी स्टडीज’ या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकांनी लिहिलेल्या ‘मेकिंग ऑफ हिंदू पेट्रियट’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना भागवत यांनी ‘कुणीही हिंदू असो, तो देशभक्त आहे. हे त्याचा मूळ स्वभाव आणि चरित्र आहे. हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही,” असं भागवत म्हणाले होते.

त्यावरून ओवैसी यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. “भागवत उत्तर देणार का?, गांधींची हत्या करणारा गोडसेविषयी काय सांगाल? नेल्ली हत्याकांड, १९८४ शीख विरोधी दंगल आणि २००२ गुजरात दंगलीला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणार?,” असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. बहुतेक भारतीय विश्वास न ठेवता देशभक्त आहेत, असं समजणं तर्कसंगत आहे. हे फक्त आरएसएसच्या अज्ञानी विचारधारेमध्ये आहे,” असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

“एका धर्माच्या अनुयायांना आपोआप देशभक्तीचं प्रमाणपत्र दिलं जात आहे. तर दुसऱ्याला आपल्याला भारतात राहायचे आहे आणि स्वतःला भारतीय म्हणण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं,” अशी टीकाही ओवैसी यांनी केली आहे.

COMMENTS