मुंबई : कोरोना आणि टाळेबंदीमुळे अनेक महिने शाळा बंद होत्या. सध्या टप्याटप्याने शाळा करण्यात आली असली तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी परिक्षांची तारीख जाहीर केली आहे.
कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. मात्र याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
COMMENTS