Loksabha Election – दुसऱ्या टप्प्यातील मतदान, आतापर्यंत 9 टक्के मतदान!

Loksabha Election – दुसऱ्या टप्प्यातील मतदान, आतापर्यंत 9 टक्के मतदान!

मुंबई – राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून एकूण 10 मतदारसंघात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार आहेत. तसेच २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

सकाळी 7 ते 9 या वेळेतील मतदानाची टक्केवारी

बुलडाणा – 7.70%
अकोला – 7.60%
अमरावती – 6.40%
बीड – 7.55%
उस्मानाबाद – 7.90%
लातूर – 8.41%
सोलापूर – 6.87%
हिंगोली – 7.94%
नांदेड – 8.88%
परभणी – 9.30%

COMMENTS