प्रशांत आवटे
बार्शी – एसटी कर्मचा-यांच्या काही संघटनांनी आज मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. याबाबत कोणत्याही संघटनेनं अधिकृतपण संपाची हाक दिली नसली. तरी खाजगीमध्ये कर्मचा-यांना संपाबाबत माहिती दिली असल्याचं बोललं जातंय. तसंच त्या आशयाचे मेसेज सोशल मीडियावरुन फिरवले जात आहेत. त्यामुळे एसटी महामंडळानं संभाव्य संप लक्षात घेऊन उपाय योजना सुरू केल्या आहेत.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचा-यांना वेतन वाढ जाहीर केली होती. मात्र ही वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करत इंटकसह काही कर्मचारी संघटांनांनी वेतनवाढीचा करार अमान्य असल्याचं म्हटलं होतं. केवळ आकड्यांचं खेळ करत परिवहनमंत्री रावते यांनी कर्मचा-यांची फसवणूक केल्याचाही आरोप इंटकने केला होता.
COMMENTS