मुंबई – एसटी कर्माचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. या अघोषित संपामुळे एसटीचा सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या संपाचा परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवला आहे. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भ मध्ये ६०% वाहतूक सुरु होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या ३५,२४९ बस फेऱ्यांपैकी १०,३९७ फेऱ्या सुरळीत सुरु होत्या अशी माहिती महामंडळानं दिली आहे.
दरम्यान दिवसभराच्या संपामुळे महाराष्ट्रातील २५० आगारातून सुमारे ३० % राज्य परिवहन बसच्या फेऱ्या सुटल्या आहेत. राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच १४५ आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती अशी माहिती महामंडळानं दिली आहे. तसेच राज्यातील ८० आगारातून दिवसभरात एकही रा.प. बसची फेरी बाहेर पडली नसल्याची माहितीही महामंडळानं दिली आहे. दरम्यान या कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपामुळे एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS