मुंबई – सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून संप मागे घेण्याचे दिलेल्या निर्देशां नंतर रात्री उशिरा झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संप बेकायदेशीर असल्याचं मत कोर्टाने नोंदवत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने राज्य सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय संघटनेशी चर्चा करण्याचेही आदेश दिल्याने संप मागे घेत आहोत, असं एसटी कर्मचारी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार नमूद करण्यात आलं आहे. चार दिवसांच्या खंडानंतर राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आज सकाळपासून रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
COMMENTS