एसटी संपाचा बळी, आंदोलन सुरू असताना कर्मचा-याचा मृत्यू

एसटी संपाचा बळी, आंदोलन सुरू असताना कर्मचा-याचा मृत्यू

अहमदनगर- राज्यभरात गेल्या २ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अकोले तालुक्यात एसटी कर्मचा-यांचे ठिय्या आंदोलन सुरू असताना एसटी वाहक एकनाथ विठ्ठल वाकचौरे (52) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वाहक असलेले वाकचौरे यांनी एसटी महामंडळात 22वर्षे सेवा केली आहे. सकाळपासूनच ते आंदोलनात बसून होते. 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या कर्मचा-यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने केली. संप मिटविण्यास चालढकल केल्याने सरकारच या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे.

संघटनेचे पदाधिकारी दशरथ सावंत यांचे भाषण सुरू असताना वाकचौरे यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळल्याचे पाहून अन्य कर्मचा-यांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS