मुंबई – केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारनंही राज्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन ५ बाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. यात काही बाबतींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. परंतु
कंटेंन्मेंमट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
या नव्या नियमावलींनुसार राज्यातील शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लास, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, लोकलसेवा, धार्मिक स्थळं, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह बंदच राहणार आहेत.
तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमास बंदी राहणार आहे.
तसेच नाट्यगृहे, बार, सभागृहे, विधानसभा सभागृह आदी बंद राहणार आहे.
कंटेंन्मेंमट झोनमध्ये काही प्रमाणात सुट
तसेच कंटेंन्मेंमट झोनमधील
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. यामध्ये सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. व्यायामासाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी आहे.परंतु दूर जाण्यास मनाई आहे.
COMMENTS