राज्यभरातील शेतक-यांच्या मुलांचं अन्नत्याग आंदोलन !

राज्यभरातील शेतक-यांच्या मुलांचं अन्नत्याग आंदोलन !

मांजरी खुर्द – राज्यभरातील शेतक-यांची मुलांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय गेतला आहे. येत्या 19 मार्चरोजी राज्यातील सर्व शेतक-यांची मुलं एक दिवस उपोषण करुन अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. 19 मार्च 1986 रोजी चिल-गव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटूंबाने पवनारला जाऊन आत्महत्या केली होती. ही दारुण घटना शेतक-यांची पहिली आत्महत्या मानली जाते. त्यामुळे यादिवशी ठिकठिकाणी शेतक-यांची मुलं अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी दिली आहे.

यवतमाळमध्ये घडलेल्या या घटनेला आता 32 वर्ष पूर्ण होत आहेत. या आत्महत्येनंतर सातत्याने शेतकऱयांच्या आत्महत्या होत आहेत. गेल्यावर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या वर्षीही हजाराहून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा ह्या वर्षीही 19 मार्चला हे आंदोलन केलं जाणार आहे. आपल्या अवतीभोवती रोज आत्महत्या होताना आपण काय करु शकतो? आपण किमान सहवेदना व्यक्त करायला पाहिजे असं अमह हबीब यांनी म्हटलं आहे. याला उपवास म्हणा, उपोषण म्हणा वा अन्नत्याग म्हणा. ते आपण व्यक्तिगत करु शकता. तुमच्या संघटनेच्या नावाने करु शकता किंवा कामावर असताना करु शकता, हवे तर एका ठिकाणी बसून करु शकता. सुजाण नागरिकांनी विशेषतः शहरात गेलेल्या किसानपुत्र व मुलींनी यात हिरीरीने भाग घ्यावा असं आवाहनही त्यावेळी अमर हबीब यांनी केलं आहे.

COMMENTS