मुंबई – राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ९ दिवस चालणार आहे. त्यामुळे या विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
दरम्यान या अधिवेशनात राज्यातील अनेक मुद्दे गाजणार आहेत. फडणवीस सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या चार वर्षात सरकारच्या अपयशाचा पाढा विरोधक वाचणार आहेत. तसेच राज्यातील दुष्काळी स्थिती, मराठा आरक्षण, वाढती महागाई, यावरही विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे हे अधिवेशन चांगलंच तापणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS