मुंबई – विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अधिवेशन आटोपतं घेतलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला.
दरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यातच सुरक्षा आढावा बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा झाली होती. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर याचा ताण येतो. सर्वच महत्वाचे व्यक्ती येथे असल्याने हा परिसर जास्त संवेदशनशील असतो.या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
COMMENTS