मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला डच्चू मिळणारी याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वादग्रस्त गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जयकुमार रावल, मंत्री म्हणून निराशनजक कामगिरी करणारे बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजप आमदार आशिष शेलार, संजय कुटे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान शिवसेनेचा १२ मंत्रीपदांचा कोटा याआधीच भरल असून या विस्तारादरम्यान शिवसेना खातेपालट करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर २७ मंत्री भाजपाचे असून ३ मंत्रीपदाच्या जागा अजूनही रिकाम्या असून या बदलाबरोबर ३ उर्वरित जागा भरल्या जातात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS