मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे …
- राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना राज्यात सुरू करण्यास मान्यता.
- राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) पोर्टलवर जोडण्याचा निर्णय.
- कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ई-ट्रेडिंगच्या नियमनासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.
- पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्पांतर्गत धरण बांधून 21 हजार 392 हेक्टर क्षेत्रास बंद नलिकेद्वारे सिंचन देण्यासाठी 1313 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता.
- शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तम सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा.
- दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकारी, निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या अंतरिम शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास मान्यता.
- बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदांमधील मारुफ करारातील 616 कर्मचाऱ्यांना कालेलकर करारातील तरतुदी लागू.
- नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या मंजूर विकास आराखड्यात क्रीडांगणासाठी आरक्षित आरक्षण क्र.24 वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास मान्यता.
- महानगरपालिकेच्या मालकीच्या मालमत्तांसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 79 (ड) मध्ये नवीन परंतुकाचा समावेश
COMMENTS