आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच विविध समस्यांबाबत करण्यात येणा-या उपाययोजनांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तसेच या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे ….

1) सहकारी संस्थांतील अधिकारी-कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू राहण्यासह या संस्थांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेस शिक्षण निधी देण्यासाठी अधिनियमात सुधारणा.

2) नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत औषध उत्पादक, विक्रेते तसेच मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळांना दंड आकारण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा.

3) महाराष्ट्र मूल्यवर्ध‍ित कर अध‍िनियमातील कलमामध्ये सुधारणा. निर्धारण आदेश नव्याने पार‍ित करण्यासाठी अतिर‍िक्त 6 महिन्यांचा कालावधी मिळणार.

4)  परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीची बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यासाठी निवड.

5) सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पास 1 हजार 610 कोटीच्या किंमतीस चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता.

COMMENTS