आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध क्षेत्रांमधील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तलेच अवनी वाघिणीच्या मृत्यूचे पडसाद आज बैठकीत उमटले आहेत. अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन शिवसेनेच्या मंत्र्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारल्याची माहिती आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1) सर्वांसाठी घरे-2022 या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पात्र लाभधारकांना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन उपलब्ध होण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासह शासकीय तसेच गायरान जमिनी तातडीने देण्यासाठी धोरणात्मक निर्णय.

2) काम करण्यास सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवासमाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्याचा निर्णय.

3) मदत व पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करण्याचा निर्णय.

4) पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी (ता. वेल्हे) देण्यात आलेल्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा.

 

COMMENTS