मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय खालीलप्रमाणे …
- मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबास वृक्षलागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या कन्या वन समृद्धी योजनेला मान्यता.
- अक्कलकोट नगरपरिषदेस यात्राकर लागू करण्यास मान्यता.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 च्या कलम 73 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.
- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उपसा सिंचन प्रकल्पास (ता. मंगळवेढा) फेररचनेसह सुधारित प्रशासकीय मान्यता.
- धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ (कनोली) उपसा सिंचन योजनेच्या प्रथम सुधारित मान्यतेमधील काही अटी शिथिल करण्याचा निर्णय.
- महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम-1961 मधील कलम 17, 18 व 23 अ मध्ये सुधारणा करणार.
- दी नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहीब अधिनियम-1956 मध्ये सुधारणा.
- कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमामध्ये सुधारणा.
COMMENTS