मुंबई – राज्यात लवकरच महाविद्यालयीन निवडणूकांचा रणसंग्राम सुरु होणार आहे. राज्य सरकारकडूनही महाविद्यालयीन निवडणूकांची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. 17 जुलैरोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरु, प्र-कुलगुरु, महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक बोलवण्यात आली आहे. दोन फे-यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. महाविद्यालयीन निवडणूकांची पहिली फेरी आॅगस्ट आणि दूसरी फेरी सप्टेंबरपर्यंत होणार आहे. 30 जुलैपर्यंत सर्व विद्यापीठांना आपले वेळापञक देण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुका चांगल्याच गाजणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान महाविद्यालयाचे प्रतिनिधी, विद्यार्थी समिती अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनीधी अशा पाच पदांसाठी निवडणूक होणार आहे. सर्वप्रथम पहिल्या फेरीत महाविद्यालयीन स्तरावर हे पाच प्रतिनिधी विद्यार्थी निवडून देतील. दुसऱ्या फेरीत त्या त्या महाविद्यालयांमधून निवडून आलेले विद्यार्थी विद्यापीठाच्या विद्यार्थी समिती अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनीधी, मागासवर्गीय प्रतिनीधी या चार पदांसाठी मतदान करणार आहेत.
COMMENTS