मुंबई – राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे.राज्यात काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी आहे. तर दुसरीकडे नांदेडमध्ये स्वतः अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी घेत अशोक चव्हाण प्रदेशाध्यपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांनी जनतेचे आभार मानले असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनो पराभवाने खचून जाऊ नका. आपली लढाई विचारधारेशी आहे. प्रेम कधीही हरत नसतं. अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास आहे. आपण एकमेकांच्या साथीने इथूनपुढेही चांगलं काम करत राहू. असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
COMMENTS