मुंबई – राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम असून उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय या कर्मचा-यांनी घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून तीन दिवस सरकारी कामकाज ठप्प होणार आहे. कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. यात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. सरकारने वारंवार फसवणूक केल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय अशी भूमिका या संघटनांनी मांडली आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारीही संपावर जाणार असल्याने आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी ही मागणी करत दिवाळीच्या वेळी सातवा वेतन आयोग लागू करणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. ही आम्हा सगळ्यांची फसवणूक आहे त्यामुळे आम्हाला संपावर जावे लागते आहे असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
COMMENTS