परदेशात शिक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, ओपन, ओबीसमधील विद्यार्थ्यांना मिळणार संधी !

परदेशात शिक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, ओपन, ओबीसमधील विद्यार्थ्यांना मिळणार संधी !

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी संधी दिली जात आहे. ओपन आणि ओबीसी (विजीएनटी) १०-१० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून जगातल्या २०० विद्यापीठांमध्ये कुठेही विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.तसेच परदेशात डिम्पोला, डिग्री आणि पीएचडीचं शिक्षण घेण्यासाठी सरकरानं हा पुढाकार घेतला आहे.

दरम्यान १० मधील ७ विद्यार्थी पीएचडीसाठी प्रवेश घेऊ शकतात तर ३ विद्यार्थी डीग्री, डिप्लोमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या विद्यार्थ्यांना सरकारकडून १५०० डॉलर दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येणार असून त्यामध्ये ३० टक्के जागा विद्यार्थ्यींनीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळणार आहे.या निवडप्रकियेसाठी वेगळी समिती गठन केली जाईल

COMMENTS