मुंबई – राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राज्यात १३ ओजस शाळा सुरु कऱण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून या शाळा यावर्षीपासून सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राज्यात १३ #ओजस शाळा होणार सुरु. शिक्षणमंत्री @TawdeVinod यांनी घेतला आढावा. या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन pic.twitter.com/JzRthB2zRv
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 29, 2018
दरम्यान आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत असताना तावडे यांनी ही माहिती दिली आहे. या ओजस शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. तसेच 14 जुलै 2017 च्या सरकारी निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील 13 “ओजस’ शाळांची निवड झालेली आहे. या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार होतील. या शाळांतील शिक्षकांना पहिल्या टप्प्यात सरकारकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापुढील टप्प्यांमध्ये या शाळांच्या मार्गदर्शनाखाली नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी तावडे यांनी दिली आहे.
COMMENTS