राज्य सरकारचा शरद पवारांना दणका, घेतला ‘हा’ निर्णय !

राज्य सरकारचा शरद पवारांना दणका, घेतला ‘हा’ निर्णय !

बारामती – राज्य सरकारनं शरद पवारांना दणका दिला आहे. सरकारने निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची भेट घेत निरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी रोखण्याची मागणी केली होती. त्यानंतर गिरीश महाजनांनीही तातडीने बारामतीला जाणारं पाणी बंद करण्याचे आदेश दिलेत. यावर शरद पवारांनी पाणी प्रश्नावरुन राजकारण न करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के तर डाव्या कालव्यातून 43 टक्के पाणीवाटपाचं धोरण 1954 च्या पाणीवाटप कायद्यानुसार होतं. परंतु शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये या करारात बदल केला. त्यात निरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून 60 टक्के पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला तर 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंत करण्यात आला होता. मात्र, आजही याच करारानुसार बारामतीला पाणी दिलं जात आहे.आता सरकारनं बारामतीचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत दोन दिवसात अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

परंतु शरद पवारांनी मात्र पाणी प्रश्नावरुन राजकारण न करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.

COMMENTS