मुंबई – राज्यातील प्रलंबित ऍट्रॉसिटीचे खटले निकाली काढण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यात सहा ठिकाणी विशेष न्यायालयांची स्थापना केली जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला राजकुमर बडोले, दिलीप कांबळे, विनोद तावडे उपस्थित होते.
दरम्यान राज्यभरात 2014 पासून ते जुलै 2018 पर्यंत एकूण 1341 खटले दाखल झाले आहेत. परंतु ते निकाली लागले नसल्यामुळे विशेष न्यायालयांची स्थापन केली जाणार आहे. यामध्ये ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिकमध्ये विशेष न्यायलयांची स्थापना केली जाणार असून येत्या महिनाभरात ही न्यायालये कार्यान्वित केली जाणार असून हे सर्व खटले निकाले लावले जाणार आहेत.
COMMENTS