राज्यातील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांसाठी खूशखबर !

राज्यातील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांसाठी खूशखबर !

मुंबई –  राज्यातील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांसाठी आनंदाची बातमी असून या स्वीय सहाय्यकांना  (पीए) आता मंत्र्यांबरोबर विमान प्रवास करता येणार आहे. वित्त विभागाने याबाबत जीआर जारी केला असून वित्त विभागाच्या जीआरनुसार आता राज्यातील मंत्र्यांचे खाजगी सचिव, स्वीय सहायक आणि ओसडी यांना इकॉनॉमी क्लासने मंत्र्यांबरोबर विमान प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे. तसेच मंत्र्यांची पत्नी बरोबर नसेल तर मंत्र्यांबरोबर एक पीए विमान प्रवास करु शकतो असंही या जीआरमध्य म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पीएंनाच ही सवलत मिळत होती. परंतु मंत्र्यांच्या पीएंना पूर्वी विमान प्रवासाची सवलत नव्हती. वित्त विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे यापुढे मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक देखील मंत्र्यांबरोबर विमान प्रवास करु शकणार आहेत. तसेच ही सवलत विधानपरिषद, विधानसभचे विरोधी पक्षनेते, सभापती, अध्यक्ष यांच्या पीएंनाही मिळणार आहे.

COMMENTS