मुंबई – राज्यात भाजप- शिवसेनेचं सरकार स्थापन होणार आहे. परंतु हे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजप-शिवसेनेत मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं गृहमंत्रालय, शहरविकास, सार्वजनिकसह बांधकाम खात्यासारखी मंत्रीपदांची मागणी केली आहे . तर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून सुभाष देसाईंचं नाव चर्चेत आहे. शिवसैनिकांकडून आणि आमदारांकडून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरत आहे. परंतु भाजप ही मुख्य मंत्रिपदं देण्यास तयार नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये आता मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे शिवसेनेने सत्तेचा समसमान वाटपाचा आग्रह धरला आहे. त्यातच आज शिवसेना आणि भाजपचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला गेल होते. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
COMMENTS