मुंबई – एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण यांचा पहिला राजकीय राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु होतोय…पश्चिम महाराष्ट्रातून ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करत आहेत, आज सायंकाळी कोल्हापुरातील प्रसिद्ध दसरा चौकात राणे यांची जाहीर सभा होणार आहे. राणे यांच्या समर्थकांनी त्यांचा दौरा आणि सभा यशस्वी करण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.
काँग्रेस सोडताना नारायण राणेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत विद्यमान भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या राजकीय समीकरणांमुळे राणे यांनी ती निवडणूक लढली नाही. भाजपचे प्रसाद लाड हे विधान परिषदेवर अगदी सहज निवडून आलेत. तर राणेंचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा मुहूर्तही लांबणीवर पडलाय.
एकप्रकारे राणे यांची राजकीय कोंडी झाल्याचे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थिवर राणे काय भाष्य करतात ? शिवसेना- काँग्रेस यांच्यासोबत राणे यांच्या टीकेच्या रडारवर आणखी कोण असेल याविषयी उत्सुकता आहे.
COMMENTS