राज्यातील हे तरुण नेते पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात, लढतीकडे सर्वांचे लक्ष!

राज्यातील हे तरुण नेते पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात, लढतीकडे सर्वांचे लक्ष!

मुंबई – या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात अनेक तरुण नेते उतरले आहेत. काही नेते तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्यामुळे त्यांच्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे रोहित पवार तर भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे पाटील
अहमदनगरमधून राष्टेय्रवादीचे संग्राम जगताप, बीडमधून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर , रायगडमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हे तरुण नेते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात

आदित्य ठाकरे, शिवसेना

ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळीमधून निवडणूक लढवत आहेत. आदित्य निवडणूक लढवत असल्याने या ठिकाणी मनसेने उमेदवार दिलेला नाही. मात्र त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश माने यांचे आव्हान आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांनी देखील आदित्य यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

रोहित पवार , राष्ट्रवादी

तसेच शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीतून रोहित पवार हे देखील कर्जत जामखेडमधून भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघात रणनिती आखली आहे.

रोहिणी खडसे, भाजप

तसेच मुक्ताईनगरमधून यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.

धीरज देशमुख, काँग्रेस

तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र यावेळी निवडणुकीच्या मैदानात आहेत. आमदार अमित देशमुख यांच्यासह त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख हे पहिल्यांदाच लातूर ग्रामीणमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.

अनिकेत देशमुख, शेकाप

तसेच शेकापचा बालेकिल्ला असलेल्या आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी आजोबाच्या जागी डॉ अनिकेत यांना उमेदवारी दिली आहे.

राम सातपुते, भाजप

माळशिरस राखीव मतदारसंघातून यंदा भाजपने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राम सातपुते मैदानात आहेत. त्यांच्यासमोर आघाडीचे शहाजी पाटील यांचे आव्हान आहे.  इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले राम सातपुते बीड जिल्ह्यातील आष्टी गावाचे आहेत. त्यांचे वडील मोहिते-पाटील यांच्या सहकार महर्षी साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी यायचे.

ऋतुराज पाटील, काँग्रेस

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील मैदानात आहेत.   ऋतुराज हे अवघे 29 वर्षाचे आहेत.  ऋतुराज पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. भाजपचे आमदार अमल महाडिक यांना  ऋतुराज पाटील यांनी आव्हान दिले आहे.

या तरुण उमेदवारांच्या लढतींकडे लक्ष

1) वडगाव शेरी – जगदीश मुळीक (भाजप)

2) हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)

3) विक्रोळी – सिद्धार्थ मोकळे, (वंचित बहूजन आघाडी)

4) मध्य सोलापूर – जुबेर बागवान  (राष्ट्रवादी)

5) बीड- संदीप क्षीरसागर  (राष्ट्रवादी)

6) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिराळे (भाजप)

7) कळवा मुंब्रा – दीपाली सय्यद (शिवसेना)

8) औरंगबाद – अमित भुईगळ, (वंचित)

9) बेलापूर – गजानन काळे (मनसे)

10) सोलापूर मध्य फारुख शाब्दी (MIM)

11) भोकरदन – संतोष दानवे पाटील  (भाजप)

12) अहमदनगर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी)

13) रायगड – आदिती तटकरे (राष्ट्रवादी)

13) साकोली – परिणय फुके (भाजप)

14) पर्वती – संदीप सोनवणे, (आप)

15) नंदुरबार – डॉ. सुनील गावित, (आप)

16) नागपूर- डॉ. अजय हडके (आप)

17) सोलापूर शहर उत्तर- आतिश बनसोडे (एमआयएम)

18) औसा – सुधीर पोतदार (वंचित)

19) करमाळा – रश्मी बागल (शिवसेना)

20) पुणे कॉन्टमेन्ट- सुनील कांबळे (भाजप)

21) केज – नमिता मुंदडा (भाजप)

22) नांदगाव – विशाल वडगुले (आप)

COMMENTS