बुलढाणा – फार्मसीचे शिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाला शैक्षणिक कर्ज आहे. परंतु, वडिलांच्या नावावर पिककर्ज असल्याने बॅंक शैक्षणिक कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांने उदिग्न होऊन मला शैक्षणिक कर्ज द्या, अन्यथा माओवादी होईल, असा इशारा दिला.
याबाबत माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्याच्या आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहणाऱ्या बाबाराव मानखैर यांचा मुलगा वैभव बोराडी येथील फार्मसी कॉलेजात दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. सध्या तो फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षक आहे. यावर्षी शेतात काहीच पिकले नाही. म्हणून वैभवने संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यांपूर्वी अर्ज केला. विद्यालक्ष्मी पोर्टलवर शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला गेला आहे.
तुमच्या वडिलांनी घेतलेले पीककर्ज न भरल्याने तुम्हाला शैक्षणिक कर्ज देऊ शकत नाही,’ असे स्पष्टीकरण देणारे पत्र बँकेने वैभवच्या हातात दिले. या प्रतिसादाने उद्विग्न झालेल्या वैभवने २३ डिसेंबरला थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहिले. आत्महत्येची परवानगी द्या. ती दिली नाही तर माओवादी होण्यावाचून पर्याय नसल्याचे त्याने या पत्रात नमूद केले आहे. सरकार या व्यथेची दखल घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
COMMENTS