मुंबई – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा देण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत सुभाष देसाई यांनी हा इशारा दिला असूननाणार प्रकल्पाचा सामंजस्य करार झाल्याचं आपल्याला माध्यमांतून कळालं असून आम्हाला याबाबतची कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही. तसेच केंद्र सरकारमध्ये अनंत गीते हे आमचे मंत्री आहेत. त्यांनाही याची कोणतीही कल्पना दिली गेली नसल्यामुळे हा प्रकल्प होणार असेल तर राजीनामा देणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे.
दरम्यान या प्रकल्पाबाबत सुभाष देसाई आणि शिवसेनेवर विरोधकांनी टीका केली आहे. परंतु आम्ही जर स्वाक्ष-या करताना तेथे असतो किंवा त्या कार्यक्रमाला हजेरी लावली असती तर सगळा दोष आमच्यावर आला असता. जनता ही शांतता पूर्ण आंदोलन करत आहे. पण त्यांची अजून परीक्षा घेणे योग्य नाही. तसेच हा प्रकल्प रेटायचा प्रयत्न केला तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.
COMMENTS