सहकारमंत्र्यांचा सहकारातच पराभव, सोलापूर बाजार समितीत पॅनल पडलं !

सहकारमंत्र्यांचा सहकारातच पराभव, सोलापूर बाजार समितीत पॅनल पडलं !

सोलापूर –  सहकारमंत्री असलेले सुभाष देशमुख यांचा सहकारातच पराभव झाला आहे. सोलापूर बाजार समितीत त्यांचं पॅनल पडलं आहे. या निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 18 जागांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सर्वपक्षीय पॅनलला 16 जागा मिळाल्या आहेत तर सुभाष देशमुख यांच्या पॅनलला केवळी दोन जागांवर समाधन मानावं लागलं आहे. दोन दिग्गज नेते या निवडणुकीत आमनेसामने असल्यामुळे अत्यंत चुरशीची ही निवडणूक पहायला मिळाली आहे.

दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्यात आलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. कारण या निवडणुकीत भाजपचे दोन मंत्री एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल तयार करुन या निवडणुकीत रणशिंग फुंकले होते. परंतु या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. तर सर्वपक्षीय पॅनलमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आपले नशीब अजमावत या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या सर्वपक्षीय पॅनलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा समावेश होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.

 

 

COMMENTS