सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत, लोकमंगलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत, लोकमंगलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

मुंबई –  सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत सापडले आहेत. सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या लोकमंगल संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकमंगल संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे दुग्धविकास विभागानं आदेश दिले आहेत. लोकमंगल संस्था देशमुख यांच्याशी संबंधित असून संस्थेने बनावट कागदपत्रे सादर करून अनुदान लाटल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याबाबत शासनाला माहिती देण्याचे दुग्धविकास विभागाने दुग्धविकास आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS